सिंधुदुर्गनगरी, ता. ४ : राज्याचे गृह (ग्रामीण), वित्त व नियोजन राज्यमंत्री तथा पालकमंत्री दीपक केसरकर हे दिनांक 5 व 6 जुलै 2019 रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा जिल्हा दौरा पुढीलप्रमाणे आहे.
शुक्रवार 5 जुलै 2019 रोजी सकाळी 9.00 वा. पणजी येथून मोटारीने आंबोलीकडे प्रयाण, सकाळी 11.00 वा. आंबोली येथे आगमन व जिल्हाधिकारी, उप वनसंरक्षक, उपविभागीय अधिकारी, प्रांत, तहसिलदार, निवेदक व सर्व संबंधित अधिकारी यांच्यासमवेत गावांस भेट व पाहणी, दुपारी 2.00 वा. शासकीय विश्रामगृह सावंतवाडी येथे जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, संबंधित विभागाचे प्रमुख अधिकारी, जिल्हा लिड बँक मॅनेजर व सर्व संबंधित अधिकारी यांच्या समवेत चांदा ते बांदा अंतर्गत विभागाची बैठक, दुपारी 4.00 वा. जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी व सर्व संबंधित अधिकारी यांच्या समवेत शासकीय विश्रामगृह, सावंतवाडी येथे आरोग्य विभागाची आढावा बैठक. दुपारी 4.30 वा. जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी व सर्व संबंधित अधिकारी यांच्या समवेत शासकीय विश्रामगृह, सावंतवाडी येथे आपत्कालीन व्यवस्थापन संदर्भात बैठक, सायं. 5.00 वा. जिल्हाधिकारी, जिल्हा खनिकर्म अधिकारी व सर्व संबंधित अधिकारी यांच्या समवेत शासकीय विश्रामगृह, सावंतवाडी येथे जिल्हा खनिकर्म निधी आढावा बैठक.
शनिवार दि. 6 जुलै 2019 रोजी सकाळी 10.00 ते दुपारी 3.00 निवजे, ता. कुडाळ येथे चांदा ते बांदा योजनेअंतर्गत गट सादरीकरण उद्घाटन कार्यक्रमास उपस्थिती.
गृहराज्यामंत्री दीपक केसरकर उद्या सिंधुदुर्ग दौऱ्यावर
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
Download WordPress Themes Nulled and plugins.
RELATED ARTICLES