आंबोली घाटात पुन्हा दरडीचा भाग कोसळला

324
2
Google search engine
Google search engine
Google search engine

आंबोली,ता.०५: येथील घाटात आज पुन्हा एकदा दरडीचा काही भाग कोसळल्याचा प्रकार घडला आहे.यात मोठ मोठे दगड रस्त्यावर कोसळले आहेत.
सुदैवाने जीवीतहानी झालेली नाही.ही घटना आज पहाटे पाच वाजताच्या सुमारास मुख्य दरड कोसळलेल्या ठिकाणावरून पाचशे मीटर अंतरावर घडली. त्यात दरड हटवण्यासाठी आवश्यक असलेली यंत्रसामग्री नसल्यामुळे 12  वाजेपर्यंत मोठमोठे दगड रस्त्याच्या बाजूला होते. त्यामुळे त्या ठिकाणी आलेल्या रस्ता कामगारांनी अन्य वाहनचालकांच्या मदतीने काही दगड बाजूला केले. याबाबतची माहिती रस्ता कामगार सुहास जोशी यांनी दिली सकाळी पाच वाजता हा प्रकार घडला होता. दरम्यान लाखो रुपये खर्च करून सुद्धा तर दरडीचे भाग कोसळत असल्यामुळे आणि त्यात मोठ मोठे दगड असल्यामुळे आंबोलीचा रस्त्याचा प्रश्न जटील बनत आहे अपघाताची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे याबाबत योग्य तो बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थ व पर्यटकांकडुन होत आहे.

\