घराची भिंतच बनली…..वैरीण,अंगावर कोसळल्याने शिरोड्यात वृध्देचा मृत्यू: मध्यरात्रीची घटना

2

वेंगुर्ले : ता.५
ज्या घराने आयुष्यभर आसरा दिला,त्या घराचीच भिंत वैरीण बनल्यामुळे शिरोडा येथे एका वृध्देला आपले प्राण गमवावे लागले.
ही घटना काल मध्यरात्री चव्हाटावाडी येथे घडली. विजया विठ्ठल पडवळ (वय ७५) असे तिचे नाव आहे.यात तिचा जागीच मृत्यू झाला आहे.
चव्हाटावाडी येथील विजया पडवळ या काल रात्री जेवण करून राहत्या घराच्या मागच्या खोलीत रोजच्या प्रमाणे झोपल्या. मात्र रात्री १२ वाजल्या नंतर सुरू झालेल्या वादळी वाऱ्या पावसामुळे घराची एक भिंत हलली आली ज्या ठिकाणी विजया पडवळ झोपल्या होत्या त्याच जागेवर कोसळली. रात्रीच्या पावसामुळे ही दुर्घटना कोणाला कळली नाही. मात्र सकाळी भिंत कोसळल्याचे सर्वांची धावाधाव सुरू झाली. त्यावेळी भिंतीखाली पडवळ असल्याचे दिसून आले. तात्काळ या बाबत पोलिसांना कळून तिला बाहेर काढले. मात्र तिचा मृत्यू झाला होता.
दरम्यान त्यांचा भाचा सत्यविजय साळगावकर , योगेश शिरोडकर ,ग्रा प सदस्य राहुल गावडे , कौशिक परब , माजी उपसरपंच दत्तगुरु परब यांनी घराची पाहणी केली व सदर महिलेस शिरोडा उपजिल्हा रुग्णालय येथे हलविले. यावेळी सरपंच मनोज उगवेकर , ग्रामविकास अधिकारी चव्हाण , पोलीस निरीक्षक भिसे , वेंगुर्लेकर, सामाजिक कार्यकर्ते बाबल गावडे, रोहित पडवळ उपस्थित होते.

23

4