गुणवत्तेला हुशारीची जोड हवी : डॉ.दिलीप पाटील

2

आनंदीबाई रावराणे महाविद्यालयात जिल्हास्तरीय प्रथमसत्र प्रशिक्षण

वैभववाडी, ता. ०५ : आजच्या काळात विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता आहे. पण फक्त गुणवत्ता असून उपयोग नाही. तर त्याला हुशारीची जोड हवी. तरच आजच्या स्पर्धात्मक काळात चांगल्याप्रकारे जीवन जगता येईल, असे प्रतिपादन आजीवन अध्ययन आणि विस्तार विभागाचे संचालक डॉ. दिलीप पाटील यांनी केले.
मुंबई विद्यापीठ, आजीवन अध्ययन आणि विस्तार विभाग आणि वैभववाडी येथील आनंदीबाई रावराणे महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय प्रथमसत्र प्रशिक्षण कार्यक्रम प्राचार्य डॉ. सी,एस. काकडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. पाटील बोलत होते. यावेळी व्यासपीठावर स्थानिक समितीचे अध्यक्ष श्री. सज्जन रावराणे, विभागाचे प्रा. डॉ. कुणाल जाधव, प्रा.सचीन राऊत तसेच जिल्हा क्षेत्र समन्वयक
डॉ. राजेंद्र मुंबरकर, प्रा. सी. डी. भेंकी, प्रा. एम. ए. ठाकूर, डॉ. प्रविण सनई, प्रा. यु, टी. परब, प्रा. एस. एन. पाटील व प्रा. पी. एम. ढेरे उपस्थित होते. सरस्वती प्रतिमापूजन, दिप प्रज्ज्वलन व विद्यापीठ गीताने कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. पाहुण्यांची ओळख व सर्व मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.
डॉ.पाटील पुढे म्हणाले, आपल्याकडे गुणवत्तेबरोबरच हुशारीची गरज आहे. जीवन जगण्यासाठी एखादे कौशल्य पुरेसे आहे. मुंबई विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन आणि विस्तार विभागामार्फत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना अशा कौशल्यांची ओळख सहा प्रकल्पांच्या माध्यमातून करुन दिली जाते. जिल्ह्यातील महाविद्यालयातील अधिकाधिक विद्यार्थ्यांनी या विस्तारकार्य उपक्रमात सहभागी व्हावे. असे आवाहनही डाँ.पाटील यांनी केले.
दुसऱ्या सत्रात विभागाचे सहयोगी प्रा.
डॉ. कुणाल जाधव यांनी आजीवन अध्ययन आणि विस्तार विभागाची ओळख, विभागाचे कामकाज, रचना, कार्यपध्दती व विभागाव्दारे राबविले जाणारे विविध उपक्रम याची सविस्तर माहिती दिली. डॉ.राजेंद्र मुंबरकर यांनी CP आणि APY , प्रा. महेंद्र ठाकूर यंनी SWS आणि IOP तर प्रा. एस. एन. पाटील यांनी PEC व NIOS या प्रकल्पांची माहिती दिली. प्रा. सी. डी. भेंकी यांनी विद्यार्थी व्यवस्थापकाची भूमिका तर प्रा. यु. टी. परब यांनी विस्तारकार्य शिक्षक व त्याची जबाबदारी यावर माहिती दिली. प्रशिक्षण कार्यक्रमातून विद्यापीठात चालणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती प्राद्यापक व विद्यार्थी व्यवस्थापक यांच्या माध्यमातून महाविद्यालय व विद्यार्थ्यांपर्यंत पोचते. तसेच शिक्षणक्षेत्रात होत असलेले बदल समजण्यास मदत होते असे अध्यक्षिय भाषणात प्राचार्य डॉ. सी.एस.काकडे यांनी सांगितले. या प्रथमसत्र प्रशिक्षण कार्यक्रमाला जिल्ह्यातील २६ महाविद्यालयातील ३६ विस्तारकार्य शिक्षक व २७ विद्यार्थी व्यवस्थापक तसेच महाविद्यालयातील विद्यार्थी मिळून ८० प्रतिनिधी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्तविक विस्तारकार्य शिक्षक प्रा. पी. एम. ढेरे व आभार प्रदर्शन डॉ. व्हि. ए. पैठणे यांनी केले. तर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. संजीवनी पाटील यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विभागाचे प्रा. राहूल भोसले, सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

8

4