रिक्षा चालक मालक संघटनेचा आमदार नितेश राणे यांना पाठिंबा

2

दुपारनंतर कणकवली शहरात रिक्षा बंद

कणकवली, ता. ०५ : आमदार नितेश राणे यांच्या हायवे आंदोलनाला कणकवली येथील रिक्षा चालक-मालक संघटनेने पाठिंबा दिला आहे. तसेच आमदार श्री. राणे यांच्या अटकेच्या निषेधार्थ आज दुपारनंतर रिक्षा व्यावसायिकांनी बंद पाळला आहे. या बंदमध्ये शहरातील रिक्षाचालकांनी उस्फूर्तपणे सहभाग घेतला. तसेच शहरातील व्यापाऱ्यांनीही आपली दुकाने बंद ठेवून आमदार नितेश राणे यांच्या अटकेचा निषेध व्यक्त केला आहे.

7

4