आमदार नीतेश राणे यांना चार दिवसांची पोलिस कोठडी

2

कणकवली, ता. ०५ : आमदार नीतेश राणे यांच्यासह स्वाभिमान पक्षाच्या 18 कार्यकर्त्यांना कणकवली न्यायालयाने चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. या सर्वांना 9 जुलै रोजी पुन्हा न्यायालयात हजर केले जाणार आहे. या सर्वांवर महामार्ग उपअभियंता प्रकाश शेडेकर यांना धक्काबुक्की, चिखलाची अंघोळ आणि गडनदी पुलाला बांधून ठेवल्या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. तसेच काल सायंकाळी त्यांच्यासह 18 स्वाभिमान कार्यकर्त्यांना अटक केली होती. या सर्वांना आज दुपारी येथील न्यायालयात हजर करण्यात आले होते.
आमदार नीतेश राणे यांना अटक केल्यानंतर प्रकृती अस्वास्थतेमुळे त्यांना उपजिल्हा रूग्णालयात ठेवण्यात आले होते. दुपारी एक वाजता श्री.राणे यांना पोलिस कोठडीत आणण्यात आले. तर दुपारी साडे तीन वाजता त्यांना कणकवली न्यायालयात हजर करण्यात आले. या सुनावणीनंतर न्यायालयाने आमदार नीतेश राणेंसह सर्व 18 जणांना चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. सरकारी पक्षाच्यावतीने अ‍ॅड.गजानन तोडकरी यांनी काम पाहिले.

11

4