सिंधुदुर्गनगरी, ता. ०५ : वाहतूक नियंत्रणाचे कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसाला शासकीय कामात अडथळा करून त्याला मारहाण केल्याच्या आरोपाखाली कुरंगवणे येथील संतोष प्रकाश ब्रम्हदंडे (३०) आणि सुहास प्रकाश ब्रम्हदंडे (३२) या दोन सख्या भावांना येथील प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश एस.डी. जगमलानी यानी विविध कलमान्वये दोषी धरत ३ वर्षे सश्रम कारावास आणि १० हजार १०० रूपये दंडाची शिक्षा सुनावली. सरकार पक्षाच्या वतीने अतिरिक्त सरकारी अभियोक्ता स्वप्निल सावंत यानी काम पाहीले.
खारेपाटण बाजारपेठेतील दरवाजा नाका येथे २० ऑगस्ट २०१६ रोजी दुपारी एकच्या सुमारास पोलीस नाईक पांडुरंग जेत्र्या राऊत वाहतूक नियंत्रणासाठी उभे होते. त्यावेळी आरोपी संतोष हा त्याठिकाणी आपले वाहन (एम एच ०७ एल ८६४३) अडथळा होईल असे पार्क करत होता. त्याचवेळी पोलीस राऊत यांनी त्याठिकाणी वाहन लावू नको असे सांगितले असता आरोपी राऊत यांच्या अंगावर धावून जात त्यांच्या कानशीलात लगावली. यादरम्यान दुसरा आरोपी सुहास हा त्याठिकाणी आपल्या ताब्यातील रिक्षा( एम एच ०७ ६१४९) घेवून येत तुझी एका मिनटात नोकरी घालवतो असे सांगितले. त्यानंतर लागलीच पोलीस नाईक पांडूरंग राऊत यांनी कणकवली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानंतर वरिल दोन्ही आरोपींवर सरकारी कामात अडथळा निर्माण करणे, धक्काबुक्की करणे या कलमान्वये गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली होती. न्यायालयासमोर हजर केले असता पोलीस कोठडी व त्यानंतर न्यायालयीन कोठडी सुनावली होती. २९ रोजी दोघांनाही जामीन मंजूर झाला होता. दरम्यान, या खटल्याची सुनावणी येथील न्यायालयात झाली. यावेळी ८ साक्षीदार तपासले गेले. फिर्यादी व तत्कालीन खारेपाटण दुरक्षेत्र विभागाचे प्रभारी शिवाजी नागरगोजे व विश्वास ठुकरल यांची साक्ष महत्त्वाची ठरली.
पोलिसांना मारहाण करणारे ब्रह्मदंडे बंधू दोषी | ३ वर्षे कारावासाची शिक्षा
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
Download WordPress Themes Nulled and plugins.
RELATED ARTICLES