काव्या देसाई खून प्रकरणी पतीस न्यायालयीन कोठडी…

2

सावंतवाडी कारागृहात रवानगी…

मालवण, ता. ५ : तालुक्यातील कुणकवळे टेंबवाडी येथील काव्या देसाई या विवाहितेच्या खून प्रकरणी अटकेत असलेला संशयित आरोपी पती गोपाळ देसाई याला कोठडीची मुदत संपल्याने आज न्यायालयात हजर केले असता पंधरा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. त्यानुसार त्याची रवानगी सावंतवाडी कारागृहात केली आहे.
कुणकवळे-टेंबवाडी येथील काव्या देसाई हिच्या आकस्मिक मृत्यूनंतर केलेल्या वैद्यकीय तपासणीत तिचा गळा दाबल्यानेच मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले होते. वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या अहवालानुसार पोलिसांनी संशयित आरोपी म्हणून पती गोपाळ देसाई याच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला होता. त्याला ५ जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. कोठडीची मुदत संपल्याने त्याला आज न्यायालयात हजर केले असता पंधरा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

17

4