डंपरचे मोठे नुकसान ; सामोपचाराने प्रकरण मिटविले…
मालवण, ता. ५ : धामापूर कासारटाका येथील वळणाच्या रस्त्यावर दोन डंपरमध्ये समोरासमोर धडक बसून अपघात झाला. हा अपघात दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास घडला. अपघातात दोन्ही डंपरचे नुकसान झाले आहे. सुदैवाने या अपघातात कोणास दुखापत झाली नाही.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी- चौके येथून कुडाळच्या दिशेने चिरे वाहतूक करणारा डंपर क्रमांक एम. एच. ०७ सी- ६८५९ व कुडाळ येथील चौकेच्या दिशेने येणारा डंपर क्रमांक एम. एच. ०७ -१८४४ यांच्यात आज धामापूर कासारटाका येथील वळणावर ब्रेक न लागल्याने समोरासमोर धडक बसली. यात डंपरच्या दर्शनी भागाचे नुकसान झाले.
या अपघातानंतर दोन्ही बाजूने वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतल्यानंतर दोन्ही वाहन मालकांनी अपघातस्थळी येत डंपर बाजूला करत वाहतुकीस रस्ता मोकळा करून दिला. हे प्रकरण सामोपचाराने मिटविण्यात आल्याचे समजते.