आरवली देवस्थान वेतोबाची फंड पेटी फोडली

2

 

[contact-form][contact-field label=”Name” type=”name” required=”true” /][contact-field label=”Email” type=”email” required=”true” /][contact-field label=”Website” type=”url” /][contact-field label=”Message” type=”textarea” /][/contact-form]

वेगुर्ला, ता.6
येथील आरवली येथील प्रसिद्ध देवस्थान श्री देव वेतोबाच्या मंदिराची फंडपेटी अज्ञात तिघा चोरट्यांकडून फोडण्यात आली आहे. यात सुमारे दीड ते दोन लाखांची रोख रक्कम चोरीला गेल्याची शक्यता ग्रामस्थांकडुन वर्तवण्यात येत आहे.
हा प्रकार काल रात्री घडला. आज सकाळी पुजारी पूजा करण्यासाठी आला असता ही घटना उघड झाली. या बाबतची माहिती मिळाल्यानंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत.
पोलिसांनी देवस्थानचे सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, त्यात तिघे चोरटे कैद झाल्याचे समजते.देवळाचा मागचा दरवाजा तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला. याबाबतचा अधिक तपास करण्यासाठी श्वानपथक मागवण्यात येणार आहे.

 

15

4