शिरोड्यातील मोबाइल शॉपी मधून १० मोबाइल लंपास

1508
2
Google search engine
Google search engine
Google search engine

वेंगुर्ला,ता. ०६ : शिरोडा येथील देवेंद्र गावडे यांच्या मोबाईल शॉपी मध्ये अज्ञात चोरट्याने चोरी करून दहा मोबाईल लंपास केले आहेत. हा प्रकार काल रात्री घडला यात सुमारे दीड लाखाचा मुद्देमालाचा समावेश आहे. याबाबतची माहिती शिवसेनेचे उपजिल्हाधिकारी सागर नानोस्कर यांनी दिली. आरवली येथील वेतोबा देवस्थान फोडल्याची घटना ताजी असतानाच शिरोडा बाजारपेठच मध्ये असलेल्या गावडे यांच्या दुकानात चोरी झाल्यामुळे या दोन्ही चोऱ्या सीसीटीव्हीत कैद झालेल्या त्या तिघा चोरट्याचा समावेश असल्याची शक्यता पोलिसांकडून वर्तविण्यात येत आहे. याबाबत ची माहिती नंतर घटनास्थळी पोलिस दाखल झाले आहे.

\