प्रदुषण जागरुकता पंधरवड्यानिमित्त सावंतवाडीत सायकल प्रभात फेरी

2

सावंतवाडी, ता. ०६ : येथे 58 महाराष्ट्र एन. सी. सी. बटालीयन सिंधुदुर्ग, एस. पी. के. महाविद्यालय, कळसुलकर इंग्लिश स्कुल व आर. पी. डी. हायस्कुल यांच्यावतीने व नगरपालिकेच्या सहकार्याने आज सकाळी प्रदुषण जागरुकता पंधरवड्यानिमित्त सायकल प्रभात फेरी काढण्यात आली.
या सायकल फेरीला सावंतवाडी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी हिरवा झेंडा दाखवून सुरवात झाली. याचा प्रारंभ जनरल जगन्नाथराव भोसले उद्यानाकडून करण्यात आला. ही फेरी सालईवाडा मारुती मंदिर, हिमालय कोल्ड्रींग, जयप्रकाश चौक, गांधी चौक मार्गे श्रीराम वाचन मंदिर, पालिका कार्यालय, रामेश्वर प्लाझा अशी काढून भोसले उद्यानाजवळ याचा समारोप करण्यात आला. या जनजागृती फेरीत सुमारे 120 महाविद्यालयीन विद्यार्थी सहभागी झाले होते.
यावेळी मुख्याधिकारी जयंत जावडेकर, आरोग्य विभाग कर्मचारी, एन. सी. सी. अधिकारी सेकंड ऑफिसर गोपाळ गवस, सचिन देशमुख, नामदेव मुठे उपस्थित होते.
भारत सरकारच्यावतीने वेगवेगळी स्वच्छता अभियाने राबविली जातात. शालेय महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी प्रदुषण जनजागृती केल्यास प्रदुषणावर नियंत्रण ठेवता येईल असे प्रतिपादन यावेळी एन. सी. सी. अधिकारी गवस यांनी केले.
सिंधुदुर्ग येथे 58 महाराष्ट्र एन. सी. सी. बटालीयन सुरू झाल्यानंतर सावंतवाडीत पहिल्यांदाच हा जनजागृतीपर कार्यक्रम झाला. कार्यक्रमास कमांडींग ऑफिसर कर्नल देवेन भारव्दाज, लेफ्टनंद कर्नल उन्नीकृष्णनन यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

26

4