नारायण राणेंची दुटप्पी भूमिका पटलेली नाही : परशुराम उपरकर

393
2
Google search engine
Google search engine
Google search engine

नितेश राणे यांच्या आंदोलनाचे समर्थन

सावंतवाडी, ता. ०६ : कार्यकर्त्यांना झुगारून आपल्या पुत्राची पाठराखण करणे आणि माफी मागणे ही राज्याचे माजी मुख्यमंत्री राहिलेल्या नारायण राणे यांची भूमिका पटलेली नाही, अशी भूमिका मनसेचे कोकणचे नेते माजी आमदार उपरकर यांनी आज येथे पत्रकार परिषदेत मांडली.

आज येथील शासकीय विश्रामगृहात त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी उपरकर बोलत होते. महामार्गावरून झालेल्या प्रकारानंतर अभियंता शेंडेकर यांच्यावर झालेल्या चिखलफेक प्रकरणात नितेश राणे यांची भूमिका योग्य होती. त्याचे मी समर्थन करतो. येथील नेत्यांनी आक्रमकता दाखवली नसल्यास अधिकारी सैराट होऊन आपल्या कामाकडे दुर्लक्ष करतात. त्याचा फटका सर्वसामान्य गरीब लोकांना सहन करावा लागतो ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात अशा मुजोर अधिकारी व महामार्गाचे काम करणाऱ्या ठेकेदार कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून असा प्रकार घडू नये यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. परंतु एकीकडे आपले कार्यकर्ते चुकीचे वागले असे सांगणाऱ्या राणेंनी दुसरीकडे आपल्या मित्राची पाठराखण करणे आणि माफी मागणे ही दुटप्पी भूमिका पटलेली नाही, असेही उपरकर म्हणाले. यावेळी मनसेचे विद्यार्थी सेनेचे शहराध्यक्ष आशिष सुभेदार, संकेत मयेकर उपस्थित होते.

\