कुडाळ-आंबेरी येथे 33 कोटी वृक्ष लागवड संकल्पाचा प्रारंभ

160
2
Google search engine
Google search engine
Google search engine

वन व सामाजिक वनीकरणकडून वृक्षारोपण : दीपक केसरकर यांच्याकडून वृक्ष लागवड

माणगाव, ता. ०६ : सरकारने १ जुलै ते ३० सप्टेंबर या कालावधीत ३३ कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प हाती घेतला आहे.
याचा प्रारंभ आज सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री तथा गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी वन व सामाजिक वनीकरणकडून वृक्षारोपण करण्यात आले.

यावेळी श्री. केसरकर म्हणाले, १ जुलै ३० सप्टेंबर पर्यंत 33 कोटी वृक्षारोपणाचा सरकारचा संकल्प आहे. पर्यावरणाचा संवर्धन जपण्यासाठी वृक्षारोपण करावे. संवर्धन जपण्यासाठी सर्वजण एकत्र येऊया वृक्षारोपण करूया. वृक्षारोपण कार्यक्रमासाठी वनविभागाचे गोविंद सावंत, श्री. सावंत आणि इतर कर्मचारी उपस्थित होते.

 

\