वेंगुर्लेत भाजपाच्या सदस्य नोंदणी अभियानाला प्रारंभ

117
2
Google search engine
Google search engine
Google search engine

विविध क्षेत्रातील नागरिकांचा समावेश

वेंगुर्ले, ता. ६ : भारतीय जनता पार्टी , वेंगुर्ले च्या वतीने तालुका कार्यालयात सदस्य नोंदणी अभियानाचा शुभारंभ डाॅ. शामाप्रसाद मुखर्जी, भारतमाता, पंडित दिनदयाळ उपाध्याय यांच्या प्रतीमेस पुष्पहार अर्पण करून मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
वेंगुर्लेतील या कार्यक्रमाला नगराध्यक्ष राजन गिरप, उपसभापती स्मिता दामले, सेवानिवृत्त बॅक अधिकारी दिपक भगत, तालुकाध्यक्ष प्रसंन्ना देसाई, जिल्हा उपाध्यक्ष राजू राऊळ, मच्छिमार नेते दादा केळुसकर व बाबा नाईक, जेष्ठ नेते बाळा सावंत, शहर अध्यक्ष सुषमा खानोलकर, नगरसेवक गटनेते सुहास गवंडळकर, नगरसेवक धर्मराज कांबळी, नगरसेवक प्रशांत आपटे, नगरसेविका श्रेया मयेकर व साक्षी पेडणेकर आदी उपस्थित होते.
भाजपच्या या सदस्य अभियानात वेंगुर्ले तालुक्यातील व शहरातील डाॅक्टर, वकील, सामाजिक कार्यकर्ते, व्यापारी, उद्योजक, प्रगतशील बागायतदार, सेवा निवृत्त कर्मचार, वारकरी संप्रदाय, मुस्लिम बांधव, ख्रिस्ती बांधव, मच्छिमार प्रतिनिधी सहभागी झाले होते.
भाजपा तालुका कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला डाॅ. राजेश्वर उबाळे, वारकरी संप्रदायाचे पुंडलिक केळुसकर, वेणुनाथ कोळंबकर, महाबळेश्वर तांडेल, मुस्लिम समाजाचे मेहबूबशहा मकानदार, अब्दुलरहेमान शेख, अलीसाहेब हसन ठाणगे, ख्रिस्ती समाजाचे जाॅन्सन फर्नांडिस, ट्राॅलर संघटनेचे बाबी रेडकर, मच्छिमार नेते बाबा नाईक, उद्योजक अमर दाभोलकर, हायटेक काॅम्पुटर अकेडमीचे गणेश अंधारी, प्रगतशील बागायतदार प्रताप गावसकर, उद्योजीका हेमा गावसकर, सेवा निव्रुत्त बॅक अधिकारी दिपक भगत अशा अनेक मान्यवरांनी सदस्य नोंदणी अभियानात सहभाग घेतला. या कार्यक्रमाला उभादांडा उपसरपंच गणपत केळुसकर, शक्ती केंद्र प्रमुख संतोष शेटकर, ताता मेस्त्री, निलेश मांजरेकर, बुथप्रमुख – प्रकाश मोटे, जयंत सावंत, राकेश सापळे, सुरेंद्र चव्हाण, व्रुंदा गवंडळकर, सुनील घाग, शांती केळुसकर, विलास मोर्जे, उदय गावडे व कार्यालय प्रमुख प्रकाश धावडे इत्यादी उपस्थित होते.

\