चिंदरमध्ये बिबट्याकडून पाच बकऱ्यांचा फडशा… | ग्रामस्थांमध्ये घबराटीचे वातावरण…

2

आचरा, ता. ६ : चिंदर भटवाडी येथे घरालगतच्या खुराड्यातील पाच बकऱ्यांचा बिबट्याने फडशा पाडल्याची घटना घडली आहे. याबाबत वनविभाग, पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.
चिंदर भटवाडी येथील जुजे बर्नाल लोबो हे शेळीपालन व्यवसाय करतात. त्यांच्या एकूण ३२ बकऱ्या असून त्या ठेवण्यासाठी त्यांनी दोन खुराडे बनविले होते. एकात १२ व दुसऱ्यात २० बकऱ्या ठेवल्या होत्या. शुक्रवारी रात्री तीनच्या सुमारास खुराडात शेळ्यांचा आवाज झाल्याने लोबो यांनी उठून बघितले असता पाच बकऱ्या गायब झाल्याचे दिसून आले. यात दोन बकरे आणि एका मोठ्या शेळीसह तीन शेळ्या गायब झाल्या होत्या. याबाबत खबर मिळताच पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. उमेश पेंडूरकर, वनविभागाचे रामचंद्र मडवळ, पोलिस पाटील दिनेश पाताडे आदींनी घटनास्थळी धाव घेतल घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे. बिबट्यांच्या वस्तीतील वावरामुळे ग्रामस्थांमध्ये घबराटीचे वातावरण आहे.

4