कोल्हापुरातील एटीएम फोडीतील दोन चोरांना अटक

137
2

सिंधुदुर्ग स्थानिक गुन्हा अन्वेषणची कारवाई

सिंधुदुर्गनगरी, ता. ०६ : कोल्हापूर जिल्ह्यातील साळवण येथील एटीएम फोडणाऱ्या दोन संशयितांना सिंधुदुर्ग स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाने फोंडाघाट येथे संशयित रित्या फिरताना अटक केले. कृष्णा नारायण गर्जे (वय ३२) व भागवत शंकर गर्जे (वय २७, रा. सांगावी-पाटोदा, जिल्हा-बीड) अशी दोन संशयितांची नावे आहेत.
५ जुलै रोजी विजयदुर्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोडी गुन्ह्यांच्या अनुषंगाने पेट्रोलियम करीत असताना हि कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडे बारदानात गुंडाळलेल्या स्थितीत लोखंडी रॉड व स्क्रू ड्राईव्हर आढळून आला आहे. विशेष म्हणजे हे दोघेही फोंडाघाट स्टेट बँक एटीएम जवळ आढळून आले. यापूर्वी त्यांच्यावर बीड जिल्ह्यात गुन्हे दाखल असल्याचे चौकशीत निष्पन्न झाले आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम व अपर पोलीस अधीक्षक निमित गोयल यांच्या आदेशानुसार पोलीस निरीक्षक प्रल्हाद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पेट्रोलिंग करीत असताना जिल्हा स्थानिक गुन्हा अन्वेषणचे उपनिरीक्षक रविराज फडणवीस व कृष्णा केसरकर, श्री. कोयंडे, श्री. इंगळे, श्री. तोरसकर, श्री. खाड्ये यांनी हि कारवाई केली आहे.

4