चौघां विरोधात गुन्हा दाखल:दारू विक्रीची टीप दिल्याच्या रागातून घटना
सावंतवाडी ता.०६: दारू विक्रीची टीप दिल्याच्या रागातून पोलिसांसमोर दोघांना लोखंडी सळईने मारहाण केल्याप्रकरणी आंबेगाव येथील चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबतची तक्रार नामदेव नाईक वय ४७ रा.आंबेगाव यांनी येथील पोलीस ठाण्यात दिली.त्यानुसार फिलिप्स फर्नांडिस,फ्रान्सिस फर्नांडिस, नीलू फर्नांडिस व जाॅन्टी (पुर्ण नाव माहीत नाही) या चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आंबेगाव येथे संबंधित कुटुंब दारू विक्री करत असल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे.त्यांना पकडून देण्यासाठी नामदेव नाईक व त्यांचे सहकारी रुपेश जाधव या दोघांनी पोलिसांना पाचारण केले होते.त्याठीकाणी पोलिसांनी जाऊन झाडाझडती घेतली.यावेळी आपल्या विरोधात पोलीस बोलावले तशी दारूची टीप दिली याच्या रागातून त्या चौघांनी लोखंडी सळईच्या साह्याने नाईक व जाधव या चौघांना मारहाण केली.हा प्रकार काल रात्री घडला होता.या प्रकरणी उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.त्याची माहिती ठाणे अंमलदार राजलक्ष्मी राणे यांनी दिली.यात लोखंडी वस्तूच्या सहाय्याने गंभीर दुखापत केल्याप्रकरणी त्या चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले.