दोडामार्ग, ता. ०६ : पर्यावरण रक्षणासाठी वृक्षलागवड, वृक्ष संगोपन करणे काळाची गरज आहे. हेच महत्त्व जाणून दोडामार्ग ग्रामसेवकांनी तेरवणच्या माळरानावर ५०० पेक्षा जास्त आंबा बियांचे रोपण केले. यावेळी मा. गटविकास अधिकारी श्री मिलिंद जाधव, सहाय्यक गटविकास अधिकारी श्री. मनोजकुमार बेहरे व कृषी अधिकारी निलेश जाधव उपस्थित होते.
ग्रामसेवक आढावा बैठकीतील एक तास बीजारोपणसाठी देऊन प्रत्येक ग्रामसेवकांनी 20 आंब्याच्या बिया माळरानावर सुरक्षित जागेत रुजत घातल्या. या बियांपासून माळरानावर आंब्याची रोपे तयार होऊन भविष्यात शंभर मोठे आम्रवृक्ष तयार होऊन पर्यावरण संतुलन राखण्यात हातभार लावतिल ग्रामसेवक संघटना अध्यक्ष यांनी बोलून दाखविली, तसेच मोठ्या प्रमाणावर झालेल्या जंगलतोडीवर उपाय म्हणून प्रत्येक गावात अशा प्रकारचे उपक्रम राबवणे आवश्यक असल्याचे सांगितले.
या उपक्रमात ग्रामसेवक संघटनेचे सर्व पदाधिकारी, ग्रामसेवक सदस्य, पंचायत समिती कर्मचारी उपस्थित होते.
दोडामार्ग ग्रामसेवकांतर्फे तेरवणच्या माळरानावर आंबा बियांचे रोपण
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
Download WordPress Themes Nulled and plugins.
RELATED ARTICLES