Sunday, January 19, 2025
Google search engine
HomeUncategorizedचंद्रकांत पाटील यांनी आधी हायवेची पाहणी करावीशिशिर परुळेकर ः काही नेत्यांकडून बांधकामंत्र्यांची...

चंद्रकांत पाटील यांनी आधी हायवेची पाहणी करावीशिशिर परुळेकर ः काही नेत्यांकडून बांधकामंत्र्यांची दिशाभूल

कणकवली, ता.6 ः हायवे उपअभियंता प्रकाश शेडेकर यांच्या कुटुंबीयांना भेटण्याची तत्परता सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी दाखवली. आता तेवढीच तत्परता कणकवली शहरातील खड्डे पाहणी करण्यासाठी दाखवावी. अशी मागणी भाजपचे माजी तालुकाध्यक्ष आणि संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष शिशिर परुळेकर यांनी केली आहे.
श्री.परुळेकर यांनी पत्रकात म्हटले की, जिल्ह्यातील काही नेतेमंडळी आपली प्रतिष्ठा सांभाळण्यासाठी बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांना चुकीची माहिती देत आहेत. कणकवलीत तसेच जिल्ह्यात खड्ड्यांची समस्याच नाही असे भासवत आहेत. यात केंद्र आणि राज्यातील भाजपची प्रतिमा डागाळली जात आहे. वस्तुतः उपअभियंता शेडेकर हा वादग्रस्त माणूस आहे. त्यांनी सतत शहरवासीयांची दिशाभूल केली आहे. तसेच अर्धवट इमारती पाडणे, निवाड्यासाठी पाठपुरावा करणे याकडे दुर्लक्ष केले आहे. पावसाळी नियोजन देखील करण्यात त्याने कुचराई केली आहे.
कणकवली शहरात 20 ठिकाणी सर्व्हिस रोड खचला आहे. नाले तुंबले आहेत. संपूर्ण महामार्ग खड्डेमय झाला आहे. अजून स्ट्रीट लाइट बसविण्यात आलेले नाहीत. सतत खड्यातून प्रवास करावा लागत असल्याने नागरिक आजारी पडत आहेत. याविरोधात सर्वच पक्षाच्या लोकप्रतिनिधींनी आंदोलने केली. एवढेच नव्हे तर संपूर्ण कणकवलीकर आंदोलनात उतरले. तरीही हायवे ठेकेदार आणि महामार्ग अधिकार्‍यांचा मुजोरपणा कमी झालेला नाही. त्यामुळेच आमदार नीतेश राणेंच्या आंदोलनाला सर्वत्र पाठिंबा मिळत आहे. ही वस्तुस्थिती बांधकामंत्र्यांना सांगण्याऐवजी चुकीची माहिती देऊन त्यांची दिशाभूल केली जात आहे. त्यामुळे आता बांधकाम मंत्र्यांनीच कणकवलीत येऊन वस्तुस्थितीची पाहणी करावी अशी मागणी श्री.परुळेकर यांनी केली आहे.

आंदोलन चुकीचे की बरोबर हे जनताच ठरवेल
आमदार नीतेश राणे यांनी केलेले चिखलफेक आंदोलन बरोबर की चूक हे न्यायालय आणि जनताच ठरवेल. परंतु आज या आंदोलनाला कणकवली, देवगडमधील व्यापारी संघटना, रिक्षाचालक, वकील संघटना, सावंतवाडी नगराध्यक्ष, मनसेची नेतेमंडळी, आमदार विजय सावंत आदींनी पाठिंबा दिला आहे. हा पाठिंबा राणेंना नसला तरी हायवेच्या निकृष्ट दर्जा तसेच ठेकेदार आणि हायवे अधिकार्‍यांच्या अनागोंदीला आहे. या सर्वांत सरकारची प्रतिमा खराब होत असल्याचेही श्री.परुळेकर यांनी म्हटले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments