सायकल चालवत कणकवलीत विद्यार्थ्यांनी दिला इंधन बचतीचा संदेश

148
2
Google search engine
Google search engine

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त काढण्यात आली सायकल रॅली

कणकवली , ता.६ : विद्यामंदिर हायस्कुलच्या पर्यावरण सेवा योजना व एन.सी.सी. विभागाच्या संयुक्त विद्यमाने जागतिक पर्यावरण दिनानिमित्त शहरातून सायकल रॅली काढण्यात आली.वाहनांमुळे होणारे प्रदूषण टाळा व सायकल चालवून आरोग्य वाढवा सुदृढ बनवा असा संदेश दिला.
विद्यामंदिर हायस्कुल येथे या रॅलीचा शुभारंभ प्रशालेचे मुख्याध्यापक बी.डी. सरवदे यांनी झेंडा दाखवुन केला.यावेळी पर्यवेक्षक पी.जे.कांबळे,सेवा योजना प्रमुख प्रसाद राणे,एस.व्ही.नागभीडकर,व्ही.एच.शिरसाट, एस.एल.कदम,जे.जे.शेळके,एन.सी.सी.विभाग प्रमुख अमोल शेळके,एस.बी.वारघडे आदी शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.
विद्यामंदिर हायस्कुल ढालकाठी मार्गे बाजारपेठ- तेलीआळी – बाजरपेठ मार्गे हायस्कुल अशी काढण्यात आली. प्रत्येक सायकलीच्या पुढे संदेश फलक ही लावण्यात आले होते. सायकल चालवा जीवन वाचवा,सायकल है जहाँ तंदरुस्ती है व हाँ, तसेच अनावश्यक वाहन न चालवता शक्य असेल त्या ठिकाणी सायकलचा वापर करा.असा संदेश दिला. विद्यार्थ्यांन समवेत यासकल चालवत शिक्षक ही सहभागी झाले होते.