संदेश पारकर यांच्या वाढदिवसा निमित्त मॅरेथॉन स्पर्धेचा शुभारंभ

147
2
Google search engine
Google search engine

पुष्कराज कोरगावकर, निशांत परब प्रथम

कणकवली, ता. ६ : गेली कित्येक वर्षे संदेश पारकर यांच्या वाढदिवसा निमित्त घेण्यात येत असलेल्या . मिनी मॅरेथॉन स्पर्धेचे उदघाटन भाजपच्या माजी जिल्हाध्यक्षा राजश्री धुमाळे व तालुकाध्यक्ष संदेश पटेल सावंत यांच्या हस्ते करण्यात आले . हि स्पर्धा पाचवी ते सातवी लहान गट व आठवी ते दहावी मोठा गट अशी घेण्यात आली . लहान गटात पुष्कराज प्रकाश कोरगावकर (विद्यामंदिर हायस्कुल,कणकवली ) तर मोठ्या गटात निशांत लीलाधर परब (विद्यामंदिर हायस्कुल कणकवली ) यांनी प्रथम क्रमाक पटकावला आहे.
कणकवली श्रीधर नाईक चौकातून या स्पर्धेचा शुभारंभ करण्यात आला . या स्पर्धेत लहान गटात २०० हुन अधिक विद्यार्थी तर मोठ्या गटात १६० विद्यार्थ्यानी सहभाग घेतला होता.
स्पर्धेचा निकाल पुढील प्रमाणे लहान गट – द्वितीय क्रमांक – मनीष कृष्णा कोकरे (विद्यामंदिर कणकवली ),तृतीय – वृषभ अनंत पाडावे (विद्यामंदिर कणकवली)
मोठा गट – द्वितीय क्रमांक – हर्षवर्धन सुहास गावडे (विद्यामंदिर हायस्कुल कणकवली ) तृतीय – सुदीप सत्यवान चाळके( विद्यामंदिर हायस्कुल कणकवली) व सोहम जनार्दन शेळके ( विद्यामंदिर हायस्कुल कणकवली) असा आहे . यावेळी नगरसेवक रुपेश नार्वेकर ,प्रा.दिवाकर मुरकर,महेश सावंत,प्रसाद अंधारी, दादा परब,अमित मयेकर ,शशांक बोर्डवेकर,निनाद दीपनाईक ,हरेश निखार्गे ,परीक्षक अच्युत वणवे , जनार्दन शेळके ,श्री .पेडणेकर, आदी उपस्थित होते . विजेत्या विद्यार्थ्यांना १४ जुलैला वाढदिवसादिनी गौरविण्यात येणार आहे.