७५ फुट उंचीचा तिरंगा कणकवलीत फडकणार…

2

कणकवली,ता.०३: येथील तहसील कार्यालयाच्या आवारातील तिरंगा आता ७५ फूट उंच फडकणार आहे. त्यासाठी तहसीलदार रमेश पवार यांच्या संकल्पनेतून कार्यालयाच्या आवाराची सफाई करून सुशोभीकरण सुरू करण्यात आले आहे.
देशाला स्वातंत्र्य मिळवून ७५ वर्षे पूर्ण झाली आहेत. या निमित्ताने देशभरात केंद्र शासनाच्यावतीने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव हा उपक्रम राबवण्यात येत आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव अंतर्गत देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनातर्फेही विविध उपक्रम होणार आहेत. तहसीलदार रमेश पवार यांनी ही संकल्पना पुढे नेत भारतीय ध्वज अधिक उंचीवर नेऊन ठेवण्याचा प्रयत्न सुरू केला. यासाठी तहसील आवाराची स्वच्छता करण्यात आली असून सुशोभीकरणाचे काम सुरू आहे. तहसील कार्यालयात भव्य ७५ फूट ध्वज उभा केला जाणार आहे. १५ ऑगस्टला ध्वज फडकवण्यासाठी सध्या प्रयत्न सुरू आहेत, असे श्री. पवार यांनी सांगितले.

101

4