फुटबॉल हा जगातील सर्वात लोकप्रिय खेळ ; संदेश पारकर

170
2

वाढदिवसानिमित्त फ़ुटबाँल स्पर्धेचा शुभारंभ

कणकवली , ता. ६ : कोणताही खेळ हा मनोरंजना पुरता न खेळता त्या खेळांमधून चांगले खेळाडू निर्माण झाले पाहिजेत. फुटबॉल हा जगातील सर्वात लोकप्रिय खेळ आहे. या फुटबॉल स्पर्धेमधील सहभागी संघानी खिलाडू वृत्तीने खेळून हि स्पर्धा यशस्वी करावी असे आवाहन कोकण सिंचन महामंडळाचे माजी उपाध्यक्ष संदेश पारकर यांनी केले.
युवा नेते संदेश पारकर यांच्या वाढदिवासा निमित्त शनिवारी विद्यामंदिर हायस्कुल पटांगणात फ़ुटबाँल स्पर्धेचा शुभारंभ युवा नेते संदेश पारकर यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी नगरसेवक रुपेश नार्वेकर,सुदाम तेली,प्रसाद अंधारी,सौरभ पारकर,आदित्य सापळे,अमित मयेकर,महेश सावंत,परशुराम झगडे,दादा कोरडे,रमेश जोगळे,साई कोदे ,श्रीपाद सापळे, प्रमोद पिळणकर,राकेश पिळणकर,ऋषी वाळके आदी पदाधिकारी खेळाडू उपस्थित होते.
या स्पर्धेचे हे १३ वे वर्ष असून यात कणकवली तालुक्यातील तसेच जिल्हयातील २० संघ सहभागी झाले आहेत. संदेश पारकर यांचा वाढदिवस म्हणजे युवा वर्गातील तरुणांना विविध उपक्रमाची जणू मेजवानी असते.संदेश प्रेमी त्यांचा वाढदिवस धुमधड्याक्यात साजरा करतात.यावर्षी हि क्रीडा,रक्तदान,शैक्षणिक साहित्य वाटप,असे समाज उपयोगी कार्यक्रम घेण्यात आल्याचे नगरसेवक रुपेश नार्वेकर यांनी सांगितले. या स्पर्धेतील विजेत्या संघास रोख रक्कम,चषक,वैयक्तिक बक्षीसे देऊन वाढदिवसादिनी मान्यवरच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे.

4