सिंधुदुर्गातील पत्रकारांचा निर्भिडपणा कायम राहीला- संदेश पारकर

2

काव्योत्सव २०१९ मध्ये कवी, साहित्यिक, पत्रकार, कलाकारांचा सत्कार

कणकवली, ता. ६ : सिंधुुदुर्ग जिल्हा परशुरामाची भुमि आहे तर आप्पासाहेबांची कर्मभुमी असुन भालचंद्रबाबांची पुण्यभुमी आहे. या जिल्हयात विविध क्षेत्रात अनेक लोक काम करत असतात. त्यामध्ये कवी, साहित्यिक, पत्रकार, कलाकारांच्या पाठिवर थाप मारण्यासाठी या सत्कार सोहळयाचे आयोजन करण्यात आले आहे. सिंधुदुर्ग जिल्हयाला बाळशास्त्री जांभेकरांचा वारसा आहे. कोकण भुमीत अनेकांना भारतरत्न मिळालेत. त्यामुळे महाराष्ट्राला उभारी देण्यासाठी वैचारिक समृद्धी देण्यासाठी आपले प्रयत्न असल्याचे प्रतिपादन कोकण सिंचन महामंडळाचे माजी उपाध्यक्ष संदेश पारकर यांनी केले.
कणकवली येथील एचपीसीएलच्या सभागृहात संदेश पारकर यांच्या वाढदिवसानिमित्त काव्योत्सव २०१९ चे आयोजन करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष गणेश जेठे, गजलकार मधु नानिवडेकर, कवी नामदेव गवळी, मालवणी कवी दादा मडकळीकर, रोटरीचे दादा कुडतरकर, अभिनेते विवेक वाळके, प्रा.दिवाकर मुरकर,बिडवाडी सरपंच सुदाम तेली, परशुराम झगडे, बाळु मेस्त्री, संजय राणे, अभिनेत्री प्राजक्ता वाडये, रंजना महाले आदींसह पत्रकार, साहित्यिक, कवी मोठया संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमात सर्वच क्षेत्रात कार्यरत असलेल्या व्यक्तींच्या योगदानाबद्दल पत्रकार, साहित्यिक, कलाकार यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, सन्मानचिन्ह देवुन संदेश पारकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
संदेश पारकर म्हणाले, सिंधुदुर्गातील पत्रकार दबावाला न झुगारता निर्भिडपणे पत्रकारिता करत आहेत. त्याचबरोबर अनेक कवींनी आपल्या काव्यातील ओळी अजरामर केल्या आहेत. काव्यातुन दिलेला विचार हजारो वर्षे कायम राहत आहे. अनेक कलाकार आपल्या जिल्हयात असुन अभिनय कौशल्याच्या जोरावर हे कलाकार कौतुकास पात्र आहे. त्यामुळे कठोर परिश्रम करुन या सन्मानीय व्यक्तींनी आपल्या क्षेत्रात चांगले स्थान प्राप्त केले आहे. वैचारिक समृद्धी निर्माण व्हावी यादृष्टीने माझ्या वाढदिवसानिमित्त हा कार्यक्रम घेतला आहे.
या कार्यक्रमात रात्रीस खेळ चाले कार्यक्रमातील प्राजक्ता वाडये, गाव गाता गझाली फेम विवेक वाळके यांचा सत्कार करण्यात आला. तसेच काव्यास्पर्धेत प्रथम सफरअली इसफ, रघुवीर परब (विभागुन), द्वितीय निलम जाधव, तृतीय बबन हिवाळेकर यांना रोख रक्कम व सन्मानचिन्ह देवुन गौरविण्यात आले. या कार्यक्रमासाठी इस्लामपुर येथुन आलेल्या मेहबुब जमादार यांचा सत्कार करण्यात आला. सत्कार समारंभानंतर जेष्ठ कवी, नवोदित कवींचे कवीता वाचन झाले. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रा. दिवाकर मुरकर, प्रा. हरिभाऊ भिसे, निलेश पवार, महानंदा चव्हाण यांनी मेहनत घेतली. या कार्यक्रमात युरेका सायन्स क्लबच्या विद्यार्थ्यांनी मराठी व इंग्लिशमध्ये आपल्या कवीता सादर केल्या. तसेच काही कवींनी प्रेमावर आधारित कविता सादर करताच महाविद्यालयीन विदयार्थ्यांनी विशेष दाद दिली. यावेळी मात्र रसिक प्रेक्षकांना हि आपले हास्य लपवता आले नाही. अन्य कवींनी विविध विषयांवर कवीता सादर केल्याने उपस्थित विद्यार्थी व नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला.

4