देवगड-जामसंडे बंदला उस्फुर्त प्रतिसाद, शहरात सर्वत्र शुकशुकाट..

285
2
Google search engine
Google search engine
Google search engine

देवगड, ता. ६ : उप-अभियंता शेडकर यांना चिखलफेक प्रकरणी आमदार नितेश राणे यांना अटक झाल्याने याच्या निषेधार्थ व आमदार नितेश राणे यांना पाठिंबा दर्शवत देवगड तालुका व्यापारी संघाच्यावतीने शनिवारी
दुपारी ३ ते रात्री ८ वाजेपर्यंत देवगड बंदची हाक देण्यात आली.
देवगड व जामसंडे बाजार पेठे मध्यें पूर्णतः शुकशुकाट पाहायला मिळाला. पूर्ण देवगड जामसंडे शहरातील
असून सर्व व्यापारी बंधूंनी आपापली आस्थापने बंद ठेवून देवगड बंदास पाठिंबा दिला. याबाबत बंदचे आवाहन देवगड तालुका व्यापारी संघाचे सचिव मधुकर नलावडे यांनी केले आहे. व्यापारी बंधूंची सभा देवगड येथे आज संपन्न झाली. यावेळी व्यापारी संघाचे सचिव मधुकर नलावडे, शैलेश कदम, प्रियंका साळसकर, संजय तारकर, प्रमोद नलावडे, शामराव पाटील, दत्तात्रय वातकर, दिनेश पटेल, मिलिंद मोर्ये, बबन मालंडकर आदी उपस्थित होते.

\