जिल्ह्याची प्रतिमा मलिन होण्यास पालकमंत्री जबाबदार…

379
2
Google search engine
Google search engine
Google search engine

संजू परब : केसरकरांना जाग आणण्यासाठी कणकवलीतील आंदोलन

सावंतवाडी, ता. ०७ : कणकवलीत आंदोलनामुळे जिल्ह्याची प्रतिमा मलिन झाली नाही तर ती ३ वर्षांपूर्वी झालेली आहे.आंबोली घाटातील दरीत मृतदेह टाकले गेले.महिन्याभरापूर्वी भर दिवसा दरोडा पडला अशा अनेक घडलेल्या प्रकारामुळेच जिल्ह्याची प्रतिमा मालिन झाली आहे याला कारणीभूत पालकमंत्री आहेत अशी टीका महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे तालुकाध्यक्ष संजू परब यांनी केली.आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.यावेळी नगरसेवक सुधीर आडीवरेकर,राजू बेग आदी उपस्थित होते.
झोपलेल्या पालकमंत्र्यांना जागे करण्यासाठी नितेश राणेंना हे आक्रमक आंदोलन करावे लागले.शिवसेनेचे नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्यासह नगरसेवक ५ कोटीच्या बक्षिसांसाठी आंदोलन करतात ही दुर्दैवी बाब आहे.जेष्ठ नगरसेविका अनारोजीन लोबो यांनी गेल्या वर्षी ड्रग्जचा विषय उघडकीस आणला होता.तेव्हाच प्रतिमा मालिन झाली.अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.

\