घारपी-असनिये रस्त्याची ग्रामस्थांनी केली श्रमदानातून डागडुजी

2

ओटवणे, ता. ०७ : घारपी-असनिये या दुर्गम भागातील रस्त्याची पूर्णपणे दुरवस्था झाली असून बांधकाम विभागाने या रस्त्याच्या डागडुजीकडे दुर्लक्ष केले आहे. या पार्श्वभूमीवर घारपी ग्रामस्थांनी रविवारी श्रमदानातून या रस्त्याची डागडुजी केली.
असनिय व घारपी या दुर्गम भागाला जोडणाऱ्या या रस्त्याचे काम दहा वर्षांपूर्वी पंतप्रधान ग्रामसडक योजनेतून करण्यात आले होते. मात्र रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याने रस्त्याची दुरवस्था झाली आहे. डांबरीकरण सर्वत्र उखडले असून अनेक ठिकाणी रस्त्याच्या बाजूला दरडी कोसळून रस्ता धोकादायक बनला आहे.रस्त्याची गटारे बुजली असून रस्त्याच्या बाजूला झाडी-झुडपे वाढली आहेत.या रस्त्याची डागडुजी करण्याची मागणी घारपी ग्रामस्थांनी सतत बांधकाम विभागाकडे केली होती,मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले.
या पार्श्वभूमीवर रविवारी घारपी ग्रामस्थांनी श्रमदानातून या रस्त्याची डागडुजी केली.यावेळी दिपक गावडे,विलास गावडे,विलास गावकर,सागर गावडे,उत्तम कवीटकर,शरद गावडे,आपा गावडे, आनंद गावडे,विजय कवीटकर,संतोष गावडे आदींसह घारपी ग्रामस्थ उपस्थित होते.

18

4