चिखलफेक प्रकरणात पोलिसांकडून पदाचा गैरवापर : परिमल नाईक

727
2
Google search engine
Google search engine

राणेंना अडकविण्याचा काहींचा पूर्वनियोजित कट

सावंतवाडी, ता. ०७ : चिखलफेक प्रकरणात आमदार नितेश राणे यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांना जिल्ह्यातील वेगवेगळ्या ठिकाणी कस्टडीत ठेवून पोलिसांनी आपल्या अधिकाराचा गैरवापर केला तसेच न्यायालयाची दिशाभूल केली, असा आरोप नगरसेवक तथा सावंतवाडी बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष परिमल नाईक यांनी आज येथे केला.
आमदार राणे हे लोककल्याणाच्या मुद्द्यावरून आंदोलनात उतरले होते. असे असताना पूर्वनियोजित कट करून त्यांना या प्रकरणात गोवण्यात आले असेही त्यांनी म्हटले आहे.
श्री. नाईक यांनी याबाबत प्रसिद्धीपत्रक दिले आहे. त्यात त्यांनी असे म्हटले आहे की, एखादा गुन्हा घडला पोलिस तपासासाठी पोलीस कोठडी मागतात. त्या काळात तपास करणे गरजेचे असते. संबंधित तपासी अंमलदारांनी त्या सर्व संशयितांना एकाच ठिकाणी ठेवणे गरजेचे होते. परंतु चिखलफेक प्रकरणात आमदार राणे यांच्यासह त्यांच्या सोबत असलेल्या अन्य कार्यकर्त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी ठेवून पोलिसांनी आपल्या पदाचा गैरवापर केला आहे. यात केवळ त्यांनी पूर्वग्रहदूषित ठेवून राणे यांच्यावर कारवाई केली. त्यांच्या विरुद्ध असणाऱ्या प्रवृत्तीला सहकार्य केले आहे. एकीकडे तपासाचा मुद्दा असता तर त्या सर्व संशयितांना एकाच ठिकाणी ठेवणे गरजेचे होते. परंतु पोलिसांकडून तसे झाले नाही. तर दुसरीकडे या प्रकरणी पोलिसांनी कोर्टाची दिशाभूल केली आहे. हा सर्व प्रकार लक्षात घेता पोलिसांनी आपल्या पदाचा गैरवापर केला. याचा अर्थ त्यांनी राणेंना त्रास देण्याचा प्रयत्न केला असा होतो, असे त्यांनी या पत्रकात म्हटले आहे.