शिवसेनेच्या पुनर्बांधणीसाठी मुंबईत वास्तव्यास असलेल्या सिंधुदुर्ग वासियांची बैठक…

2

मोठ्या संख्येने उपस्थित रहा; आमदार नाईकांसह जिल्हाप्रमुखांचे आवाहन…

मालवण,ता.०७: राज्यात घडलेल्या सत्तांतरानंतर शिवसेना संघटनेच्या पुनर्बांधणीसाठी मुंबईत वास्तव्यास असलेल्या सिंधुदुर्ग वासियांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. ही सभा ८ ऑगस्टला सायंकाळी ६ वा. परेल येथील शिरोडकर हायस्कूल मधील शिशु विकास हाॅलमध्ये संपन्न होणार आहे. या बैठकीला जास्तीत-जास्त शिवसेना प्रेमींनी उपस्थित रहावे, असे आवाहन असे आमदार वैभव नाईक व जिल्हाप्रमुख संजय पडते यांनी केले आहे.

या बैठकीत शिवसेना सचिव खासदार विनायक राऊत, शिवसेना उपनेते गौरीशंकर खोत, संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख आमदार वैभव नाईक, जिल्हाप्रमुख संजय पडते आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तरी मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण, डोंबिवली, वसई, विरार, बदलापूर, अंबरनाथ, मीरा रोड, नालासोपारा आदी ठिकाणी वास्तव्यास असलेले शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक व चाकरमानी जे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुळ रहिवासी आहेत, त्यांनी बैठकीला मोठया संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन आ. वैभव नाईक व संजय पडते यांनी केले आहे.

186

4