सावंतवाडीत आयोजित मेळाव्यात दिला इशारा
सावंतवाडी ता,07 :
गरज पडली तर सावंतवाडी विधानसभा निवडणूक भाजप स्वबळावर लढेल तशी आमची तयारी आहे त्यामुळे कार्यकर्त्यांनी कामाला लागा असे आवाहन आज येथे आयोजित मेळाव्यात कोकण व गोवा प्रांत युवा संघटन मंत्री सतीश धोंड यांनी केले.शिवसेना हा आमचा मित्र पक्ष नाही तर आम्ही बरोबर नाही जात आहोत त्यामुळे निवडणुकांनंतर मित्र हा शब्द काढून टाकावा असेही त्यांनी यावेळी सांगितले.
सावंतवाडी भाजपाचा सदस्यता अभियान बुथ कार्यकर्ता मेळावा आज येथील आरपीडी हायस्कूलच्या सभागृहात झाला. यावेळी प्रदेश सरचिटणीस राजन तेली, महिला जिल्हाध्यक्षा सौ.स्नेहा कुबल, तालुकाध्यक्ष महेश सारंग, विस्तारक पंकज मुताला, उपनगराध्यक्षा सौ. अन्नपूर्णा कोरगावकर, अभियान संयोजक प्रभाकर सावंत, सर्व्हे टीम अध्यक्ष राम भोजणे, शहर अध्यक्ष अखिलेश कोरगावकर, मनोज नाईक, राजू गावडे, संदीप गावडे, मंदार कल्याणकर, श्याम काणेकर, बुथ अध्यक्ष आनंद तळवणेकर, प्रसाद अरविंदेकर आदी उपस्थित होते.
यावेळी धोंड म्हणाले, भारतीय जनता पक्षाच्यावतीने सदस्य नोंदणी अभियानाला सुरुवात करण्यात आली आहे. संपूर्ण महाराष्ट्रात 1 कोटी सदस्य नोंदणीचे लक्ष पक्षाने ठेवले आहे. पुढे येणाऱ्या निवडणुका भाजपा कार्यकर्त्यांच्या विचारावर शतप्रतिशत भाजपा या संकल्पनेनुसार लढविल्या जाणार आहेत. नुकतीच लोकसभा निवडणूक पार पडली. करण्यासाठी लोकांच्या घरोघरी जाऊन सदस्य नोंदणी अभियान राबवित आहे. हाच या दोहोंमधील फरक असल्याचे त्यांनी सांगितले. दुसऱ्याचे ओझे किती दिवस घेऊन जगणार हे असा प्रश्न धोंड यांनी केला.
यावेळी श्री तेली म्हणाले राष्ट्रीय महामार्गाचे काम 70 वर्षे अडकले होते. मात्र भाजपाने त्याला गती देऊन गडकरी यांनी 18 हजार कोटी खर्च करीत हा महागमार्ग पूर्ण केला. कराड, चिपळूण नवीन रेल्वेसेवा झाली. रेल्वे टर्मिननस राज्य व केंद्रशासनाच्या माध्यमातून अनेक उपक्रम, योजना सुरु आहेत. येणाऱ्या विधानसभा, जि.प, पं.स., ग्रामपंचायत सर्व निवडणुकांवर भाजपा पक्ष निवडून येणार आहे.आंबोली, गेळे जमीन प्रश्न आम्ही सोडविला हे पक्षाचे यश आले. मच्छिमारांच्या पाठिशी आम्ही असून गेली 10 वर्षे तुम्ही मंत्री आहात तरीही हे प्रश्न सोडवू शकला नाहीत, असा टोला लगावत कोकणातील भाजपच्या आमदारकीची सुुरुवात सावंतवाडी मतदारसंघातूनच होणार असे तेली म्हणाले.पुढे येणारी विधानसभा निवडणूक लक्षात घेऊन भाजपा पक्षाच्या संघटनेचे काम करायचे आहे.त्यासाठी विधानसभा रोडमॅक तयार करायचा आहे. नवीन मतदार नोंदणी, विस्तारक योजना, विधानसभा बुथ संमेलन, जनसंवाद मतदार कार्यक्रम आदी वेगवेगळे अभियान राबविण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
यावेळी महिला जिल्हाध्यक्षा सौ. स्नेहा कुबल,तालुकाध्यक्ष महेश सारंग यांनी मार्गदर्शन केले.