सावंतवाडी,ता.०७: बांदा शहर युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष सिद्धेश महाजन यांनी आज भाजपात प्रवेश केला. येथे आयोजित करण्यात आलेल्या भाजपच्या मेळाव्यात पक्षाचे संघटन मंत्री सतीश धोंड यांच्या हस्ते त्यांना प्रवेश देण्यात आला. श्री महाजन सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत आहेत. स्पंदन युथ फाऊंडेशनचे ते संस्थापक अध्यक्ष आणि बांदा येथील दीपावली शोटाइम आदि सांस्कृतिक क्षेत्रातून त्यांनी आपली वाटचाल सुरू ठेवली होती. युवा कार्यकर्ते असल्यामुळे त्यांच्यासोबत एक कार्यकर्त्यांची फळी आहे. गेले काही दिवस पक्षापासून अलिप्त होते. आज त्यांनी भाजपात प्रवेश केला आहे. सावंतवाडी येथे आयोजित कार्यक्रमात त्यांनी प्रवेश केला. यावेळी माजी आमदार राजन तेली, तालुकाध्यक्ष महेश सारंग, श्यामकांत काणेकर, महिला ज़िल्हा अध्यक्ष स्नेहा कुबल, सावंतवाडी उपनगराध्यक्ष अन्नपूर्णा कोरगावकर, जिल्हा परिषद सदस्य श्वेता कोरगावकर, पंचायत समिती सदस्य शितल राऊळ, बांदा सरपंच मंदार कल्याणकर आदी उपस्थित होते महाजन यांच्या समवेत सुधीर शिरसाट, बाळा आकेरकर, केदार कणबर्गी, प्रवीण नाटेकर, आबा धारगळकर, संतोष नाटेकर, आदी उपस्थित होते.