आंबोलीत वादळी-वाऱ्यासह पावसामुळे ठिकठिकाणी पडझड…

2

बत्ती गुल,पर्यटकांची गैरसोय;संबंधित अधिकाऱ्यांची पाठ…

आंबोली, ता. ०७ : गेल्या तीन दिवसांपासून वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळत असल्यामुळे येथील जनजीवन विस्कळीत झालं आहे.ठिकाणी लाईटचे खांबही कोसळले व अनेक ठिकाणी वायर्स ही तुटून पडल्या आहेत.त्यामुळे पर्यटन हंगामाच्या मुख्य शनिवार-रविवारी दोन दिवस लाईटच गेल्यामुळे पर्यटकांना याचा मोठा फटका बसला.
आगाऊ आरक्षण केलेल्या पर्यटकांनी तसेच राहत असलेल्या पर्यटकांनी खोल्या सोडणे पसंत केले.त्यामुळे तेथील पर्यटन व्यावसायिकांना नुकसान सहन करावे लागले,तसेच अनेक उपहारगृहांचे आइस्क्रीम्स खराब झाले व नाशिवंत मासे,चिकन,मटन खराब झाले.महावितरणचे सर्व कर्मचारी लाईट पुन्हा चालू करण्यासाठी अतोनात प्रयत्न करत असताना दिसत होते.परंतु महावितरणचे कोणतेही ही वरिष्ठ किंवा कनिष्ठ अधिकारी त्या ठिकाणी पोहोचले नव्हते.ज्यामुळे रविवारी सायंकाळी उशिरापर्यंत वीज सुरू झाली नव्हती.
वर्षा पर्यटनाच्या धरतीवरती पोलीस प्रशासन तसेच बांधकाम विभागाने व वनविभागाने चोख व्यवस्था ठेवली होती.परंतु महावितरणकडून दोन दिवस वीज गायब असतानाही कोणताही अधिकारी आंबोलीत फिरकला नसल्याने ग्रामस्थांमधून तीव्र संताप व्यक्त होत होता.

37

4