वृक्ष लागवडी बरोबर ती जगविण्याची जबाबदारी सर्वांची…

2

सरपंच नीलिमा परुळेकर : मिर्याबांदा शाळेत वृक्षारोपण…

 

मालवण, ता. ७ : बेसुमार होणार्‍या वृक्षतोडीमुळे पर्यावरणाचा र्‍हास होत असून. त्याचे दुष्परिणाम सर्वांनाच भोगावे लागत आहेत. यावर उपाय म्हणून सर्वांनीच वृक्ष लागवड करायला हवी. केवळ झाडे लावून आपली जबाबदारी संपत नाही तर लावलेली झाडे जगवायला हवीत आणि ती जबाबदारी सर्वांनी पार पाडली पाहिजे, असे प्रतिपादन सर्जेकोट मिर्याबांदा गावच्या सरपंच सौ. नीलिमा परुळेकर यांनी केले.
मिर्याबांदा शाळेच्या आवारात सरपंच सौ. परुळेकर यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले तसेच विद्यार्थ्यांनीही शाळेच्या आवारात वृक्ष लागवड केली. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्रीकृष्ण बागवे, उपसरपंच सुनील खवणेकर, ग्रामपंचायत सदस्य विनायक आरोलकर, स्वप्नाली सावजी, स्नेहा शेलटकर, हेमंत सावजी, भारती आडकर, गणेश जाधव, शाळा समिती अध्यक्ष राधिका खडपकर आदी तसेच शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. आभार मुख्याध्यापक श्री. बागवे यांनी मानले.

11

4