आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून गोळवणात ताडपत्रीचे वाटप… शासनाच्या विविध योजनांचा लाभ शेतकऱ्यांना देणार ; हरी खोबरेकर

2

मालवण, ता. ७ : आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून गोळवण येथे जिल्हा परिषद सदस्य हरी खोबरेकर यांच्या हस्ते ताडपत्रीचे वाटप करण्यात आले.
यावेळी श्री. खोबरेकर म्हणाले, ज्याप्रमाणे जिल्हा परिषद मधील ताडपत्री ही माफक दरात मिळते पण त्याचा लाभ काही ठराविक लाभार्थ्यांनाच मिळतो. त्यामुळे जे शेतकरी वंचित राहतात त्यांना आमदार नाईक यांनी ही ताडपत्री उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच शेतकरी बांधवांसाठी विविध कृषी विभागाची योजना, चांदा ते बांदा योजना, जिल्हा परिषदेच्या योजना आल्या आहेत याची माहिती दिली. खासदार, पालकमंत्री यांच्या माध्यमातून विविध योजनांचा लाभ जास्तीत जास्त शेतकरी बांधवांना मिळवून दिला जाईल असे आश्‍वासनही त्यांनी दिले.
यावेळी ग्रामस्थांनी शिवसेना विभाग प्रमुख विजय पालव, शिवसेना उपविभाग प्रमुख भाऊ चव्हाण, सरपंच सौ. प्रज्ञा चव्हाण यासर्वांचे स्तुत्य उपक्रमाचे आयोजन केल्याबद्दल आभार मानले. यावेळी बूथ प्रमुख तुळाजी घाडीगावकर, विनय चिरमुले, दिगंबर सावंत, उपशाखा प्रमुख एकनाथ चव्हाण, सुहास घाडी, युवासेना शाखा युवाधिकारी आनंद चिरमुले, ज्येष्ठ शिवसैनिक विश्वनाथ गावडे, नामदेव गावडे, रामचंद्र सावंत, दिगंबर चिंदरकर, धाकू चव्हाण, राजा गावडे, राजन परब, सुंदर लाड, मुरलीधर गावडे, अरुण घाडीगावकर, शशिकांत नेरुरकर, अरुण परब, संतोष चव्हाण, महेश घाडी, सत्यविजय चिरमुले, संजय परब, भाऊ जाधव, शिवसेना कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.

22

4