विजेचा दाब वाढल्याने इलेक्ट्रॉनिक वस्तू जळाले
वेंगुर्ले, ता. ७ : शनिवारी मध्यरात्री वादळी वादळी वाऱ्यायासह पडलेल्या पावसात वेंगुर्ला तालुक्यात नुकसान झाले आहे. छप्पराचे पत्रे उडून जाणे, विद्युत वाहिन्यांवर झाड पडणे तसेच वीजेचा दाब वाढल्याने टी.व्ही. व मिक्सर जळाल्याच्या घटना घडल्या असल्याची आपत्ती विभागाकडून देण्यात आली आहे.
वेंगुर्ला तालुक्यात सध्या वादळी वाऱ्यासह पाऊस पडत आहे. शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पडलेल्या पावसामुळे दाभोली-दाभोलकरवाडी सय्यद कादर कोंडी यांच्या घराच्या छप्पराचे पत्रे उडून गेले. तसेच दगडी भितही कोसळली. यात कोंडी यांचे सुमारे ३५ हजाराचे नुकसान झाले आहे. दाभोली-लोखंडेवाडी मार्गावर असलेल्या विद्युत पोलावर जंगली झाड पडल्याने विद्युत तारा तुटून नुकसान झाले. या घटनेची खबर मिळताच वीज विभागातर्फे तुटलेल्या विद्युत तारा जोडण्याचे काम सुरु होते. तर वीजेच्या वाढलेल्या दाबामुळे उभादांडा गावातील भेंडमळा-आडारी येथील काही घरातील मिक्सर व टिव्ही जळाले आहेत. तालुक्यात आज १६.८ मी.मी. तर एकूण १०९६.४४ मी.मी. एवढ्या पावसाची नोंद झाली आहे.