पॉवर ट्रिलरने केली जातेय नांगरणी; जिल्ह्यात पावसाची दमदार हजेरी

2

वैभववाडी/पंकज मोरे, ता. ०८ : सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावल्याने भात लावणीला जोरदार सुरूवात झाली आहे. कोणी पारंपरिक तर कोणी आधुनिक पध्दतीने शेती करीत आहेत. जिल्ह्यात काही ठिकाणी अजूनही सामुहिक पध्दतीने शेती केली जाते. परंतु विज्ञान तंत्रज्ञानाच्या युगात शेतकऱ्यांचा जास्त कल पॉवर ट्रिलरसारख्या आधुनिक यंत्राकडे दिसतो. त्यामुळे शेतकऱ्यांना कमी खर्चात तसेच कमी वेळेत, कमी मनुष्यबळात जास्त उत्पन्न मिळत आहे. त्यामुळे या विकसित यंत्र सामुग्रीने शेतीचा विकास नक्कीच होईल, असे येथील शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
जिल्ह्यात सगळीकडे पावसाने दमदार हजेरी लावली असून ठिकठिकाणी भात लावणीला सुरूवात झाली आहे. मे महिन्याच्या शेवटी पेरणी केलेली बियाणे आता लावणी योग्य झाली आहे. सलग आठ दिवस मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे शेतकरी भात लावणीच्या कामात मग्न झाले आहेत. पॉवर ट्रिलरसारख्या आधुनिक तंत्राने शेतकरी शेती करु लागले आहेत. काही प्रमाणात पारंपरिक शेती देखील दिसून येते. त्याचबरोबर सुधारित आणि संकरित भात बियाण्यांमुळे कमी क्षेत्रात अधिक उत्पन्न घेणे शक्य झाले आहे.

6

4