संबंधीत अधिकाऱ्यांना निवेदन : उपाययोजना करण्याची ग्वाही
वेंगुर्ले, ता.८ : चीपी विमानतळावरील पाण्याचा प्रवाह बदल्यामुळे परुळे-कर्ली-नमसवाडीतील शेतकरी-बागायतदारांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. याबाबत भाजपा च्या वतीने ग्रामस्थांना घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन देऊन योग्य ती कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली.
पाण्याचा प्रवाह बदल्यामुळे परुळे-कर्ली-नमसवाडीतील शेतकरी-बागायतदारांचे नुकसान होत आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी दिलेल्या निवेदनाची तातडीने दखल घेऊन नुकसानीची पहाणी आय.आर.बी.चे अधिकारी लोणकर व अमर पाटील यांनी ग्रामस्थांना सोबत घेऊन केली. यावेळी आय.आर.बी. कंपनीने विमानतळाचे बांधकाम करत असताना पुर्वांपार असलेल्या छोट्या नाल्यांचा मार्ग बंद करून एकाच नाल्यामध्ये पाणी सोडल्याने पाण्याच्या प्रवाहाने बागायतदारांचे नुकसान झाले. हे स्पष्ट दिसत आहे. त्यामुळे येत्या आठ दिवसात बंद केलेले छोटे नाले पुर्वव्रत करुन देण्याचे आश्वासन आय.आर.बी.कंपनीचे अधिकारी लोणकर यांनी ग्रामस्थांना दिले. भाजपा प्रदेश चिटनीस राजन तेली यांनी दूरध्वनी वरुन आय.आर.बी.च्या वरीष्ठ अधीकारयांबरोबर चर्चा करुन या प्रश्नी मार्ग काढला. यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष प्रसंन्ना देसाई, परुळे शक्ती केंद्र प्रमुख राजु दुधवडकर, बुथप्रमुख नितेश तुळसकर , बागायतदार योगेश सामंत , भिकाजी ऊर्फ तात्या पवार, दिपक दुधवडकर, कालिदास चिपकर, दिपक मळेकर, रोहीत मळेकर, निखिल करलकर, गोपाळ मळेकर, जयेश दुधवडकर, तुषार राऊळ तसेच कर्ली येथील ग्रामस्थ उपस्थित होते.