कलमठ ग्रामस्थांचे महावितरण कार्यालयाला धडक

176
2

तीन दिवस वीज पुरवठा खंडित असल्याने वीज ग्राहक संतप्त

कणकवली, ता. ८ : शहरालगतच्या कलमठ गावात गेले तीन दिवस वीजपुरवठा खंडित होत आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी आज येथील महावितरण कार्यालयाला धडक दिली. यावेळी कार्यालयात उपस्थित असलेले उपकार्यकारी अभियंता गिरीश भगत यांना ग्रामस्थाने घेराव घातला. यापुढे वीज पुरवठा खंडित झाल्यास महावितरण कार्यालयावर मोर्चा काढू आणि अधिकाऱ्यांना बाहेर पडू देणार नाही असा इशारा उपस्थित ग्रामस्थांनी दिला. कार्यकारी अभियंता गिरीश भगत यांनी महावितरण अधिकाऱ्यांकडून वीज समस्यां बाबतची माहिती घेतली. यावेळी कलमठ पोलीस स्टेशन लगत वीज तारा तुटल्याने एक दिवस वीज पुरवठा ठप्प झाला होता. तर आशिये गावात मुख्य वीज वाहिनी मध्ये बिघाड असल्याने दोन दिवस वीज पुरवठा खंडित होता. आज दुपारी तीन वाजेपर्यंत या सर्व समस्या दूर केल्या जात आहेत. त्यामुळे उद्यापासून कलमठ आणि लगतच्या परिसरात वीज पुरवठा खंडित होणार नाही अशी ग्वाही श्री भगत यांनी दिली. यावेळी ग्रामस्थांनी स्टेट लाईट बंद अनेक वादांमध्ये स्ट्रीट लाईट नसणे कमी दाबाचा वीजपुरवठा आदी समस्या मांडल्या. ग्रामस्थांमध्ये कलमठ सरपंच वैदेही गुडेकर ग्रामपंचायत सदस्य राजू राठोड, लेखा मेस्त्री, बाबू आचरेकर व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.

4