तिलारी धरणाचे ऑडीट व्हावे : यशवंत आठलेकर

2

रस्ते खोदाई करणार्‍या ठेकेदाराविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी

दोडामार्ग, ता. ०८ : तिवरे धरण फुटण्याची घटना ताजी असतानाच तिलारी धरणाची सुरक्षा लक्षात घेता स्ट्रक्चरल ऑडीट करण्यात यावे अशी मागणी भाजपाचे सरचिटणीस यशवंत आठलेकर यांनी आज येथे केली.
दरम्यान जिओ केबलमुळे तालुक्यातील रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. त्यामुळे बांधकाम विभागाने संबंधित काम करणार्‍या ठेकेदाराविरोधात गुन्हा दाखल करावा, अन्यथा आम्ही जनहित याचिका दाखल करू असा इशारा त्यांनी दिला आहे.
आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी उपसभापती लक्ष्मण नाईक, रंगनाथ गवस, उपनगराध्यक्ष चेतन चव्हाण, शहराध्यक्ष योगेश महाले, सुनील गवस, प्रवीण गवस, पराशर सावंत, दिपक गवस, संदीप नाईक आदी उपस्थित होते.

18

4