जिल्ह्यातील 7 लघू पाटबंधारे प्रकल्प भरले

2

सिंधुदुर्गनगरी, ता. ०८ : जिल्ह्यात सुरू असलेल्या दमदार पावसामुळे जिल्ह्यातील आंबोली, माडखोल, निळेली, पावशी, हरकुळ, ओझरम आणि लोरे असे 7 लघू पाटबंधारे प्रकल्प पूर्ण भरले आहेत. ओझरम प्रकल्पासून सध्या 12.08 घ.मी. प्रतिसेकंद पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तर सनमटेंब आणि पुळास लघु पाटबंधारे प्रकल्पांमध्ये 90 टक्क्यापेक्षा जास्त पाणीसाठा झाला आहे. देवघर मध्यम प्रकल्प 45.36 टक्के भरला आहे. तर तिलारी आंतरराज्य प्रकल्प 43.86 टक्के भरला असून सध्या या प्रकल्पामध्ये 196.2250 द.ल.घ.मी. पाणीसाठा झाला आहे. तिलारी प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या चोवीस तासात 80.80 मि.मी. पाऊस झाला असून यंदाच्या वर्षी आजपर्यंत 1258.00 मि.मी पाऊस झाला आहे.

जिल्ह्यातील नद्यांच्या पातळीमध्येही वाढ होत असून तिलारी नदीची पातळी तिलारीवाडी येथए 38.900 मीटर इतकी आहे. पावशी येथे कर्ली नदीची पातळी 3.800 मीटर असून खारेपाटण पुलाजवळ वाघोटन नदीची पातळी 3.200 मीटर इतकी झाली आहे.

6

4