आंबोली धबधब्यावर उद्यापासून पुन्हा कर आकारणी

2

वनविभागाचा निर्णय:प्रसंगी पोलीस बंदोबस्त मागविण्याचा निर्णय

सावंतवाडी,ता.०८: आंबोली धबधब्यावर आकारला जाणारा करबंदीचा निर्णय दोन दिवसात वन विभागाने मागे घेतला आहे. आता हे अधिकार पारपोली वन समितीला देण्यात आले असून उदया पासुन पुन्हा दहा रूपये कर आकारला जाणार आहे.
प्रसंगी पोलीस बळ वापरून त्या ठिकाणी कर आकारू असा निर्णय आज येथे झालेल्या बैठकीत घेण्यात आला. त्यामुळे आंबोली पारपोली व चौकुळ या तीन गावात आंबोली धबधब्याच्या मालकीवरून निर्माण झालेला वाद आता अधिक उफाळण्याची शक्यता आहे.
आंबोली आकारला जाणारा कर कोणी घ्यावा ते पैसे कोणी जमावे याबाबत तीन गावांच्या समित्यांमध्ये एकमत नव्हते या विषयावरून दोन दिवसापूर्वी झालेल्या बैठकीत एकमत न झाल्यामुळे आकारण्यात येणारा कर बंद करण्याचा निर्णय वनविभागाने घेतला होता. परंतु अचानक कर बंद करण्यात आल्यामुळे वनविभागाच्या अधिकाऱ्यांवर टीका झाली. त्यामुळे त्यांनी आज तातडीची बैठक बोलावली. या तीनही गावाच्या समित्यांच्या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे ऐकून घेतले मात्र एकमत न झाल्यामुळे अखेर पोलीस बंदोबस्तात कर आकारणी सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबतची माहिती आंबोलीचे वनक्षेत्रपाल दिगंबर जाधव यांनी दिली.
कर आकारणी न करण्याचा निर्णय घेतल्यामुळे पारपोलीचे नुकसान होणार होते त्यामुळे पोलीस बंदोबस्त ठेवून पुन्हा ही कर आकारणी सुरू करण्यात चा निर्णय घेण्यात आला आहे.

4