वैभववाडी महिला स्वाभिमाचा इशारा; पोलिसांना निवेदन
वैभववाडी, ता. ०८ : आमदार नितेश राणे यांच्यावर शासनाने आकसापोटी कारवाई केली आहे. कारवाईची पद्धत चुकीची आहे. जाचक कलमे लावून आमदार नितेश राणे यांना विनाकारण बदनाम करण्याचा प्रयत्न झाल्यास खपून घेणार नाही. असा इशारा वैभववाडी महिला स्वाभिमानच्या वतीने देण्यात आला आहे. शासनाच्या या वृत्तीचा त्यांनी निषेध व्यक्त केला. याबाबतचे निवेदन वैभववाडी पोलीस ठाण्याचे ठाणे अमंलदार यांच्याकडे सुपूर्द केले आहे.
यावेळी तालुकाध्यक्ष प्राची तावडे, नगराध्यक्ष दीपा गजोबार, उपसभापती हर्षदा हरयाण, माजी सभापती शुभांगी पवार, न.पं.समिती सभापती समिता कुडाळकर, नगरसेविका अक्षता जैतापकर, विद्या पाटील, आदी उपस्थित होत्या.
मुंबई-गोवा हायवे चौपदरीकरण कामाची झालेली दयनीय अवस्था त्यामुळे याचा फटका सर्वसामान्यांना बसत आहे. जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडणे हे प्रत्येक लोकप्रतिनिधीचे काम असते. ते काम करत असताना आमदार नितेश राणे यांच्यावर झालेली कारवाई ही सूडबुद्धीने करण्यात आली आहे, असे निवेदनात म्हटले आहे.