चिखलफेक आंदोलनाला सावंतवाडी डंपर चालक-मालक संघटनेचा पाठिंबा : महेंद्र सांगेलकर

389
2
Google search engine
Google search engine
Google search engine

सावंतवाडी, ता. ०८ : आमदार नितेश राणे यांच्या चिखलफेक आंदोलनाला सावंतवाडी डंपर चालक मालक संघटनेने पाठिंबा दिला असून म्रग्रूर प्रशासन व गेंड्याच्या कातडीचे अधिकारी यांना हिच भाषा समजते असे प्रतिपादन अध्यक्ष महेंद्र सांगेलकर यांनी केले.

पुढे बोलताना सांगेलकर म्हणाले की, आमदार नितेश राणेबद्दल काही सत्ताधारी मंडळींचा द्वेष इतका पराकोटीला पोचला आहे की जिल्ह्याच्या एका आमदाराला पोलिस कोठडीत टाकले जाते मात्र निर्ढावलेला शेडेकर नावाचा बाहेरील अधिकारी इथे येऊन आपली मनमानी करतोय याची या तथाकथित पुढाऱ्यांना जनाची नाही तर मनाची लाज वाटली पाहिजे. असल्या बेजबाबदार, मुजोर अधिकाऱ्यांला या पुढाऱ्यांमुळे अशी वागायची हिंमत होते. आम्ही सर्व डंपर वाले वेगवेगळ्या पक्षात असलो तरी एक गोष्ट मान्य केली पाहिजे की आमदार नितेश राणे यांची याआधीची डंपर आंदोलन, बांगडा फेक आंदोलन, चिखलफेक आंदोलन ही सर्व आंदोलने सिंधुदुर्गातील जनतेसाठी होती, वैयक्तिक लाभाचा त्यांनी कधीच विचार केला नाही त्यामुळे आम्हा डंपरवाल्यांचा या आंदोलनाला पाठिंबा असून आमदारांवर जाचक कलमे लावून पोलिस कोठडीत टाकणारे प्रशासनाचा जाहिर निषेध करतो आसेही सांगेलकर म्हणाले. यावेळी उपाध्यक्ष आशिष कदम, सचिव केतन आजगांवकर, प्रमोद सावंत, बलवंत कुडतरकर, जितू गांवकर, उमेश पेडणेकर, महेंद्र सावंत, रफिक शेख, तौसिफ शेख, संधू टेंबकर, शंकर सावंत आदी उपस्थित होते.

\