राजेंद्र म्हापसेकर : दोडामार्ग बीएसएनएलच्या अधिकाऱ्यांना इशारा
दोडामार्ग ता.०९: तिलारी परिसरात बंद असणारा बीएसएनएलचा मोबाईल टाॅवर तात्काळ सुरु करा,या मागणीसाठी जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र म्हापसेकर यांनी आज दोडामार्ग येथे बीएसएनएलच्या अधिकाऱ्यांना घेराओ घालत जाब विचारला.यावेळी तात्काळ मोबाईल टॉवर सुरू करा,अन्यथा जोपर्यंत टॉवर सुरू होत नाही तोपर्यंत कार्यालय बंद ठेवा अशी मागणी यावेळी करण्यात आली.
या परिसरात हजारो मोबाईल आहेत.तेही बीएसएनएल धारक आहेत.असे असताना त्या भागात टॉवर बंद का? बीएसएनएल जिओ कंपनीला विकणार तर तसे सांगा असा सवाल यावेळी श्री.म्हापसेकर यांनी उपस्थित केला.यावेळी लखु खरवत,महेश लोंढे,प्रवीण गवस,योगेश महाले आदी उपस्थित होते.