सावंतवाडी,ता.9
येथील शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी आज कोलगाव येथील आयटीआयला धडक दिली व विविध दुरवस्थेबाबत प्रशासनाला जाब विचारला यावेळी आयटीआय गेले अनेक दिवस प्राचार्यांसह अन्य पदे रिक्त असल्यामुळे अनेक गोष्टीत विद्यार्थ्यांना गैरसोयींना सामोरे जावे लागत असल्याचे उघड झाले
युवा सेना शिवसेना आणि महिला आघाडीच्या शिष्टमंडळाने धडक देऊन महत्त्वाच्या विषयावर चर्चा केली त्यात धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत. एकाच प्राचार्याची आठ ठिकाणी नेमणूक असल्याने येथे बऱ्याच प्रमाणात दुर्लक्ष होत आहे, शौचालयाची दुरवस्था आहे याचा विचार तात्काळ होणे आणि संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी होणे आवश्यक आहे, असे युवासेना उपजिल्हाधिकारी श्री सागर सोमकांत नाणोसकर येथे सांगितले आहे. यावेळी सावंतवाडी नगरसेविका अनारोजीन लोबो, उपजिल्हा संघटक शब्बीर मणियार, युवासेना तालुका अधिकारी योगेश नाईक, युवासेना उपतालुका अधिकारी गुणाजी गावडे, शिवसेना महिला संघटना तालुका संघटक सौ रश्मी माळवदे, शिवसेना महिला संघटना तालुका संघटक सौ.अपर्णा कोठावळे, श्री प्रशांत कोठावळे, सावंतवाडी शहर समन्वय सौ श्रृतिका दळवी, श्री ओंकार आळवे, श्री. ओंकार सावंत श्री. सौरभ पडते. आदि सर्व शिवसेना युवासेना महिला आघाडी चे पदाधिकारी आदी कार्यकर्ते उपस्थित होते