सिंधुदुर्गनगरी ता.०९:
सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेने सलग दुसऱ्या वर्षी आपल्या जिल्हा परिषद शाळेतील मुलांसाठी ‘एक दिवस बांधावर’ हा उपक्रम राबविला आहे. पहिल्याच दिवशी याला भरभरून प्रतिसाद लाभला आहे. पडवे येथील जिल्हा परिषद शाळेच्या मुलांनी केवळ शेतीच्या बांधावर उभे न राहता प्रत्येक्षात भात लावणी करीत शेतीचे धडे गिरविले.
पहिल्याच वर्षी या उपक्रमाला चांगला प्रतिसाद लाभला तसेच सर्वच स्तरावर उपक्रमाचे स्वागत, कौतुक झाले. त्यामुळे यावर्षी याला व्यापक स्वरूप देण्यात देऊन ९ व १० जुलै रोजी हा उपक्रम राबविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. जिल्हास्तरीय पदाधिकारी व अधिकारी यांना यासाठी शाळांचे वाटप करण्यात आले होते. त्यानुसार हा उपक्रम पार पडत आहे.
कुडाळ तालुक्यातील पडवे येथील जिल्हा परिषद शाळेच्या मुलांनी प्रत्येक्ष भात लावणी करीत शेतीचे धडे गिरविले. यावेळी ग्राम पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी कमलाकर रणदिवे जिल्हास्तरीय अधिकारी म्हणून उपस्थित होते. यावेळी त्यांनी आपल्या विभागातील कर्मचाऱ्यांना सुद्धा या उपक्रमात सहभागी करून घेतले होते. सरपंच सुभाष दळवी, केंद्रप्रमुख आनंद धुत्रे, मुख्याध्यापक सौ दाबोसकर, ग्रामसेवक श्री तांबे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, सदस्य, ग्राम पंचायत सदस्य, ग्रामस्थ, ग्राम पंचायत कर्मचारी, अंगणवाडी मुले व कर्मचारी उपस्थित होते.
पडवे शाळेतील मुले शेतात….जिल्हा परिषदेच्या ‘एक दिवस बांधावर उपक्रमाला जिल्ह्यात भरभरून प्रतिसाद
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
Download WordPress Themes Nulled and plugins.
RELATED ARTICLES