वेताळ प्रतिष्ठानच्या वतीने वेंगुर्ले सागर किनारा स्वछता

169
2
Google search engine
Google search engine
Google search engine

वेंगुर्ले : ता.९ तुळस येथील वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग या सामाजिक संस्थेच्या वतीने श्रमदानातून वेंगुर्ला येथील सागरेश्वर किनारा व सागरेश्वर मंदिर परिसर स्वछता करण्यात आली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पातून स्वच्छ भारत अभियान अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या स्वच्छ भारत ग्रीष्माकालीन इंटर्नशिप अभियान स्वच्छता पंधरवडा उपक्रमामध्ये ‘स्वच्छते साठी एक पाऊल’ उचलत वेताळ प्रतिष्ठानने दरवर्षी प्रमाणे श्रमदानातून सागर किनारा स्वच्छतेसाठी खारीचा वाटा उचलला आहे. यावेळी प्रतिष्ठानच्या वतीने वेंगुर्ले येथील सागरेश्वर समुद्र किनारा व किनाऱ्या लागतच पर्यटन स्थळ तथा पवित्र आध्यात्मिक स्थान म्हणून प्रसिद्ध असलेले सागरेश्वर मंदिर परिसर स्वच्छ केला. प्रतिष्ठानच्या वतीने गतवर्षी मोचेमाड, वेळागर, सागरेश्वर व सगरतीर्थ अशा चार किनाऱ्यावर स्वच्छता करण्यात अली होती. त्याचप्रमाणे यावर्षीही सागरेश्वर किनाऱ्यावर श्रमदनातून स्वच्छता करत उपक्रमाला सुरुवात केली आहे.
वेंगुर्ले येथील सागरेश्वर किनारा व पवित्र अध्यात्मिक स्थळ असल्याने नेहमीच पर्यटनाच्या दृष्टीने पर्यटकांच्या पसंतीचे असून या किनाऱ्यावर गर्दी असते यामुळे पर्यटन व पर्यावरणीय दृष्ट्या स्वच्छतेसाठी प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी श्रमदान केले.यावेळी किनाऱ्यावर असलेल्या दीर्घकाळ टिकणारा, पर्यावरणास हानिकारक असलेला आणि आरोग्याच्या दृष्टीने घातक असलेला कचरा उचलण्यात आला. यामध्ये थर्माकॉल, रबर, प्लास्टिक पिशव्या, फायबर, प्लास्टिक व काचेच्या बाटल्या अश्या प्रकारचा कचरा उचलून तेथील कचरा पेट्यामध्ये टाकण्यात आला. या उपक्रमात प्रतिष्ठानचे अध्यक्ष सचिन परुळकर, कुंदा सावंत, प्रेमा परब, वैभव होडावडेकर,रोहन राऊळ, शुभम सावंत, समीर गावडे, प्रशांत सावंत, मिलन नाईक,सदन वराडकर,प्राची गोरे, कृष्णा सावंत, मंगेश सावंत,महेश राऊळ, किरण राऊळ, यशवंत राऊळ, ओंकार राऊळ, गुरुदास तिरोडकर आदी कार्यकर्ते यांनी श्रमदान करत स्वच्छता उपक्रमात सहभाग घेतला.

\