वेंगुर्ले-आसोली- बीएसएनएल प्रश्न सुटण्याच्या मार्गावर…

277
2

पी.बी.कुंभार; टॉवर दुरुस्तीसाठी यंत्रणा घटनास्थळी दाखल…

वेंगुर्ले ता.०९: तालुक्यातील आसोली-फणसखोल येथील बीएसएनएल टॉवर काही यांत्रिक बिघाडामुळे गेले महिनाभर बंद आहे.त्यामुळे येथील भागात बीएसएनएलची रेंज पूर्णतः गायब झाली आहे.याबाबत बीएसएनएलचे उपविभागीय अभियंता पी.बी.कुंभार यांच्याशी संपर्क साधला असता टॉवर दुरुस्तीसाठी कर्मचारी-यंत्रणा घटनास्थळी दाखल करण्यात आली आहे.उद्यापर्यंत बिघाड दुरुस्त करून सुविधा सुरळीत करू असे आश्वासन श्री.कुंभार यांनी दिले.दरम्यान कालच यासंदर्भात येथील उपसरपंच विकी केरकर यांनी श्री.कुंभार यांना निवेदन दिले होते.या निवेदनाची दखल घेऊन ही कार्यवाही करण्यात आली.यावेळी नारायण घाडी,मंदार धुरी,संतोष चव्हाण,मयूर नाईक,तुषार परब आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
आसोली गावात सुरवाती पासूनच गेली अनेक वर्षें बीएसएनएलचा खेळखंडोबा सुरू आहे.तर हल्लीच्या काळात गेले चार-पाच महिने ही समस्या अधिकच वाढली आहे.येथील भागात बीएसएनएल शिवाय दुसरा पर्याय उपलब्ध नसल्यामुळे येथील मोबाईल धारकांवर आपले मोबाईल बंद करून ठेवण्याची वेळ आली आहे.या समस्येमुळे येथील नागरिकांची संबंधित प्रशासनाबाबत तीव्र नाराजी आहे.यासंदर्भात येथील नागरिक संबंधित प्रशासनाला तक्रारी करून आता हैरान झाले आहेत.त्यामुळे येथील नागरिकांची गैरसोय लक्षात घेता,तात्काळ बिघाड दुरुस्त करून सुविधा सुरळीत करावी अशी मागणी श्री.केतकर यांनी अधिकाऱ्यांकडे केली आहे.

4