सावंतवाडी एकता दहीहंडी उत्सवात साकारलेला “आर्मी स्टॅच्यू” लक्षवेधी…

6
2

 

सावंतवाडी ता. १९: येथील मुजीब शेख मित्र मंडळाच्या वतीने एकता दहीहंडी उत्सवात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त साकारण्यात आलेला “आर्मी स्टॅच्यू” लक्षवेधी ठरला. यावेळी येथील युवा कलाकार दीपेश शिंदे यांच्या संकल्पनेतून हा मानवी देखावा तयार करण्यात आला होता. दरम्यान हा देखावा पाहण्यासाठी नागरिकांनी सुद्धा मोठी गर्दी केली होती.
यावेळी मुजीब शेख, मार्टिन आल्मेडा, अण्णा म्हापसेकर, प्रविण गावडे, जितेंद्र म्हापसेकर, सदा काजरेकर, मंडळाचे सल्लागार सदस्य नारायण तेंडोलकर, सतिश वरखडेकर, तन्वीर शेख, कबीर शेख, आनंद परब, बाबासाब दर्गावाले, आबा राऊळ, शेबर आंदुर्लेकर, दिपेश शिंदे, आयुब खान, सौ. मिताली राऊळ, रवी मळीक, आनंद परब तसेच वसंत प्लाझा ईमारतीतील सर्व गाळेधारक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

4